सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

एखाद्या व्यक्तीचे तीस वर्षांचे आयुष्यच खूप आहे, कि त्याच्याकडे काहीतरी सांगण्यासारखे असलेच पाहिजे. हा साक्षात्कार झाल्यामुळेच आम्ही काही लिहायचे ठरविले आहे. त्यातून आम्ही वावरतो ते क्षेत्र आहे पत्रकारितेचे. त्यामुळे खरोखरच समाज जवळून पाहायला मिळतो. अगदी इच्छा नसतानाही अनेक गोष्टी, घटना पाहायला, अनुभवायला मिळतात. त्या सर्वाना बातम्यांचे रूप मिळतेच असे नाही. अनेक प्रश्न पडतात, कधी उद्विग्नता येते, कधी आनंद होतो, कधी वाटते आपण का या ठिकाणी आहोत. सर्वच प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत. पण सावेदाशील मन काही त्याचा पाठपुरवा केल्याशिवाय राहत नाही.  अशाच अनुभवांचे मनावर उमटलेले ठसे...तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा हा प्रपंच....